MR/Prabhupada 0156 - तुम्हाला विसरले आहेत काय मी, शिकविण्यासाठी प्रयत्न करीत आहे



Arrival Address -- London, September 11, 1969

पत्रकार: आपण काय प्रयत्न करता आणि शिकवता, साहेब?

प्रभुपाद: जे तुम्ही विसरला आहात ते मी शिकवण्याचा प्रयत्न करतोय.

भक्त: हरीबोल!, हरे कृष्ण! (हशा)

पत्रकार: कोण काय आहे?

प्रभुपाद: तो देव आहे. आपल्या पैकी कोणी म्हणतात की देव नाही आहे, आपल्या पैकी कोणी म्हणतात देव मेलेला आहे, आणि आपल्यापैकी काही म्हणतात की देव व्यक्तीनिरपेक्ष आहे किंवा शून्य. हा सर्व मूर्खपणा आहे. मला ह्या सर्व मूर्खांना शिकवायचे आहे की देव आहे. ते माझे धेय आहे. कुठलाही मूर्ख माझ्याकडे येऊ शकतो. मी देव आहे हे सिद्ध करीन. ते माझे कृष्णभावनाभावित आंदोलन आहे. ते नास्तिक लोकांसाठी एक आव्हान आहे. देव आहे. जसे आपण समोरासमोर बसलो आहोत, तुम्ही देवाला समोरासमोर बघू शकता. जर आपण प्रामाणिक आहात आणि आपण गंभीर आहात, तर हे शक्य आहे. दुर्दैवाने, आपण देवाला विसरण्याचा प्रयत्न करतो: त्यामुळे आपण जीवनात बर्‍याचश्या दुखांना आमंत्रण देतो. त्यामुळे मी कळकळीचा उपदेश करीत आहे की तुमच्याकडे कृष्णभावनाभावित आंदोलन आहे आणि सुखी राहा. मायेच्या मूर्ख लाटांनी दिशाहीन होऊ नका, किंवा भ्रामक कल्पनेच्या. ती माझी विनंती आहे.

भक्त: हरीबोल!