MR/Prabhupada 0157 - जोपर्यंत तुमचं हृदय शुद्ध होत नाही हरी काय आहे तुम्हाला समजू शकत नाही



Lecture on SB 6.2.11 -- Vrndavana, September 13, 1975


जर तुम्ही शास्त्रातल्या सूचना स्वीकारल्या नाहीत, विशेषता जेव्हा भगवान श्रीकृष्ण भगवंत गीतेत तुम्हाला सूचना देतात. ते सर्व शास्त्रांचे सार आहे. तुम्ही ते स्वीकार. मग तुम्ही आनंदी व्हाल. नाहीतर नाही. तर इथे असं सांगितलंय की अघवान, पापी मुनुष्य, शुद्ध होऊ शकत नाही, नुसत्या या धार्मिक विधींनी, प्रयश्चित्त,किंवा व्रत पळून, व्रत. मग हे कस शक्य आहे? कारण प्रत्येकजण... यथा हरेर नाम. म्हणून शिफारस केली आहे,

हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम् कलौ नास्त्येव नास्त्येव नास्त्येव (चै.च.आदी 17.21).

तीच गोष्ट. तुम्हाला शास्त्रातील सूचनांमध्ये कधी विरोधाभास आढळणार नाही. अग्नी पुराणामध्ये असं सांगितलं आहे आणि श्रीमद भागवत सुद्धा तीच गोष्ट सागते. अग्नी पूर्ण सांगत,हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम्. आणि इथे श्रीमद भागवतात सांगितलंय,

यथा हरेर्नामपदैरुदाहृतै स्तदुत्तमश्लोकगुणोपलम्भकम्(श्री.भा. 6.2.11)

हरेर्नाम म्हणजे पवित्र नामाचा जप. ते सोपं आहे. पण जेव्हा तुम्ही हरेर्नामाचा जप करता मग हळूहळू तुम्हाला समजत. हरी काय आहे,त्याच रूप काय आहे, त्याचे गुण काय, त्याचे कर्म काय आहे. मग तुम्ही समजू शकता. कारण हरेर्नामशिवाय तुम्हचे हृदय मलिन आहे.

चेतो दर्पण मार्जनम (चैतन्य चरितामृत अंत्य 20.12)

त्याच नाव काय आहे, त्याच रूप काय आहे, त्याचे गुण काय, त्याचे कर्म काय आहे. तुम्हाला समजू शकणार नाही.

अतः श्रीकृष्णनामदि न भावेद् ग्राह्यमिन्द्रियै: (चै.च.मध्य 17.136)

जर आपण निरर्थक इंद्रियांचा वापर केला, आपण श्रीकृष्णांना जणू शकणार नाही. म्हणून लोक श्रीकृष्णांना जणू शकत नाही. त्यांना हरी नामाचपण मूल्य कळत नाही. कारण त्यांची इंद्रिय बोथट आहेत. मायेच्या प्रभावाने दूषित झालेली, ते समजू शकत नाहीत.

चेतोदर्पणमार्जनम् भवमहादावाग्नि निर्वापणम् (चै.च.अंत्य 20.12)

पण फक्त हा मार्ग आहे. कारण आपल्याला शुद्ध करणं गरजेचं आहे, ही एकमेव पद्धत आहे. हरे कृष्णाचा जप करा. मग आपण हळूहळू शुद्ध होऊ.

पुण्यश्रवणकीर्तन: पुण्यश्रवणकीर्तन: श्रुण्वतां स्वकथां कृष्णः पुण्यश्रवणकीर्तन: (श्री.भा 1.2.17)

जर तुम्ही श्रीकृष्णांबद्दल श्रवण केलंत,उत्तमश्लोक जसे सांगितले तसे. तद उत्तमश्लोक-गुणोपालमभाकम, त्याचे अनेक फायदे आहेत. तर हरे कृष्ण चळवळ ही इतकी महत्वाची आहे की प्रत्येकाने ती गंभीरपणे घेतली पाहिजे.

कीर्तनीय: सदा हरि:
तृणादपि सुनीचेन तरोरपि
सहिष्णुना अमानिना मानदेन
कीर्तनीय: सदा हरि: (चै.च.आदी 17.31)

हा चैतन्य महाप्रभूंचा आदेश आहे. कठीण...

पदं पदं यद् विपदां (श्री.भा. 10.14.58)

या भौतिक जगात इथे फक्त विपद आहे. इथे संपद नाही. मूर्खपणें आपण असा विचार करतो " आता मी खूप छान आहे." छान काय आहे? तुम्हाला पुढच्याच क्षणी मरणाला समोर जायचं आहे. चॅन काय आहे? पण ही मूर्ख मांस सांगतात, "हो, मी छान आहे." तुम्ही कोणालाही विचारा,"तू कसा आहेस?" "हो, खूप छान." ते छान काय आहे? तुम्ही उद्या मरणार आहात. तरीही चॅन. एवढंच. हे चाललं आहे. म्हणून हे आहे पदं पदं यद वि... ते होण्यासाठी वैज्ञानिक शोध लावत आहेत. पण हे दुष्ट, त्यांना मृत्यू कसा थांबवायचा माहित नाही. तर छान काय आहे? पण त्यांच्याकडे समजण्यासाठी मेंदू नाही. पण श्रीकृष्ण सांगतात, "या समस्या आहेत, तुम्ही शास्त्रज्ञ, तुम्ही खूप गोष्टींसाठी प्रयत्न करत आहात."

जन्म-मृत्य-जरा-व्याधी-दुःख-दोषानुदर्शनं (भ.गी. 13.9)

सगळ्यात पाहिलं शोधा तुमच्या समस्या काय आहेत. जन्म-मृत्यू-जरा-व्याधी. तुम्हाला जन्म घ्यावं लागतो, तुम्हाला मरण आहे. तुम्हाला व्याधी भोगाव्या लागतात, तुम्ही वृद्ध होणार आहात. . हे पाहिलं थाबवा, मग वैज्ञानिक प्रगतीबद्दल बोला. नाहीतर तुम्ही मूर्ख आहात. धन्यवाद.