MR/Prabhupada 0198 - वाईट सवयीचा त्याग करा आणि हरे कृष्ण मंत्र जपा



Temple Press Conference -- August 5, 1971, London


स्त्री प्रश्नकर्ता: आतापर्यंत जगात आपल्या अनुयायिंची संख्या किती झाली आहे किंवा आता आपण मोजू शकत नाही ...?

प्रभुपाद: बघा , कुठल्याही खऱ्या गोष्टीसाठी खूप कमी अनुयायी असतील , आणि कुठल्याही वाईट गोष्टीसाठी अनुयायी अनेक असतील .

स्त्री प्रश्नकर्ता : किती ... माझे म्हणणे आहे दीक्षा घेतलेल्या अनुयायांची संख्या ज्या लोकांनी ...

प्रभुपाद: आमच्याकडे सुमारे तीन हजार आहेत .

स्त्री प्रश्नकर्ता :आणि ती सतत वाढत आहे का?

प्रभुपाद: होय, संख्या मंद गतीने वाढत आहे.. कारण आमच्याकडे बरेच प्रतिबंध आहेत लोकांना कोणततेही निर्बंध आवडत नाहीत.

स्त्री प्रश्नकर्ता : होय. सर्वात अधिक संख्या कुठे आहे? अमेरिकेत ?

प्रभुपादः अमेरिका, युरोप , कॅनडा , जपान व ऑस्ट्रेलिया मध्ये . आणि भारतात लाखो आहेत, या पंथाचे लाखो आहेत . भारताबाहेर, इतर देशांमध्ये ते लहान प्रमाणात आहेत . पण भारतात लाखो आणि लाखो आहेत.

पुरुष प्रश्नकर्ता :तुम्हाला वाटते की तुमची चळवळ हि देवाबद्दल जाणून घेण्याचा एकमेव मार्ग आहे ?

प्रभुपाद: ते काय आहे?

भक्त: देव जाणण्याचा हाच एकमेव मार्ग आहे का?

प्रभुपाद: होय.

पुरुष प्रश्नकर्ता: तुम्ही हे आश्वासन कसे देऊ शकता ? प्रभुपाद: अधिकाऱ्यांकडून, देवाकडून, कृष्ण . कृष्ण म्हणतो, सर्व-धर्मान् परित्यज्य माम् एकम् शरणम् व्रज (भ गी १८।६६)

पुरुष प्रश्नकर्ता: पण कुणीतरी असे म्हणाले की देवाने त्याला आणखी काहीतरी सांगितले होते, तर तुम्ही त्याला सारखेच मानता का?

श्यामसुंदर: असे नाही की आम्ही इतर धार्मिक प्रक्रिया स्वीकारत नाही.

प्रभुपाद: नाही, आम्हाला इतर प्रक्रियांवर विश्वास आहे .तसेच जसे तिथे पायऱ्या आहेत . तुम्हाला सर्वात वरच्या गोष्टीवर जायचे असल्यास, तुम्ही पायऱ्यांद्वारे जाता . तर त्यांच्यातील काही पन्नास पावले गेले आहेत, त्यांच्यातील काही शंभर पावले गेले आहेत, पण आवश्यक पावले पूर्ण करण्यासाठी हजार पावले आहेत.

पुरुष प्रश्नकर्ता: आणि तुम्ही हजार पावले पूर्ण केली आहेत का ?

प्रभुपाद: होय. स्त्री प्रश्नकर्ता : आज आय सकाळी आमच्यापैकी एखाद्याला अनुयायी व्हायचे असेल तर आम्ही काय द्यायला किंवा सोडायला हवे ?

प्रभुपाद: सर्वप्रथम अवैध संभोग जीवन सोडावे लागेल .

स्त्री प्रश्नकर्ता : त्यात सर्व लैंगिक जीवन आहे कि ... प्रभुपाद: हम्म ?

स्त्री प्रश्नकर्ता : अवैध म्हणजे काय? प्रभुपाद: अवैध संभोग ... लग्नाशिवाय, कोणत्याही संबंधाशिवाय, लैंगिक जीवन, हे अवैध संभोग जीवन आहे .

स्त्री प्रश्नकर्ता : म्हणजे लग्नामध्ये संभोगाला परवानगी दिली जाते, परंतु बाहेर नाही .

प्रभुपाद: ते पशु संभोग जीवन आहे. जसे प्राणी , त्यांचे नाते नसते आणि त्यांचे संभोग जीवन जगतात. पण मानवी समाजात निर्बंध आहेत. प्रत्येक देशामध्ये प्रत्येक धर्मात विवाहाची पद्धत आहे. म्हणून लग्न न करता, संभोग जीवन म्हणजे अवैध संभोग जीवन.

स्त्री प्रश्नकर्ता : पण विवाहानंतर संभोग करण्याची परवानगी आहे. प्रभुपाद: होय, स्त्री प्रश्नकर्ता : आणि एखाद्याला अजून काय सोडावे लागेल ...

प्रभुपाद: त्यांना सर्व प्रकारचे मादक पदार्थ सोडणे आवश्यक आहे.

स्त्री प्रश्नकर्ता : ते मादक पदार्थ कि मद्य ?

प्रभुपाद: कोणतेही द्रव्य जे मादक आहे .

श्यामसुंदर : चहा सुद्धा आणि ... प्रभुपाद: चहा, सिगारेट सुद्धा . ते देखील मादक आहेत.

स्त्री प्रश्नकर्ता : म्हणजे त्यात दारू, मरिजुआना, चहा यांचा समावेश आहे.अजून काही ? प्रभुपाद:त्याला पशु अन्नाचे त्याग करावा लागतो. सर्व प्रकारचे पशू खाद्य . जसे मांस, अंडी, मासे. आणि त्याला जुगार सोडावा लागेल.

स्त्री प्रश्नकर्ता : एखाद्याला आपल्या कुटुंबाला सोडडवे लागले का? मला वाटतं सर्व लोक मंदिरात राहतात, नाही का?

प्रभुपाद: होय, हो. जोपर्यंत एखादा सर्व पापी गोष्टींना सोडून देत नाही तोपर्यंत त्याला दीक्षा देऊ शकत नाही.

स्त्री प्रश्नकर्ता : तर एखाद्याला आपल्या कुटुंबाचा सुद्धा त्याग करावा लागेल ? प्रभुपाद: कुटुंब?

स्त्री प्रश्नकर्ता : होय. प्रभुपाद: अर्थात, कुटुंब. आम्हाला कुटुंबाशी देणे घेणे नाही आहे , आम्ही वैयक्तिक व्यक्तीचा विचार करतो . जर एखाद्याला या कृष्ण भावनामृत चळवळीत सहभागी व्हायचे असेल तर त्यांना हे सर्व पापी क्रियाकलाप सोडून द्यावे लागतील.

स्त्री प्रश्नकर्ता : तर मग तुम्हाला कुटुंबहि सोडावे लागेल. पण .. श्यामसुंदर : नाही, नाही, तुम्हाला कुटुंबाला सोडण्याची गरज नाही .

स्त्री प्रश्नकर्ता : पण मला असे म्हणायचे होते कि मला जर दीक्षा घेण्याची इच्छा असेल तर मला इथे येऊन राहावे लागणार नाही का? श्यामसुंदर : नाही . प्रभुपाद: गरज नाही .

स्त्री प्रश्नकर्ता : ओह, मी घरी राहू शकते ? प्रभुपाद: होय, हो.

स्त्री प्रश्नकर्ता : कामाबद्दल काय? एखाद्याला त्याची नोकरी सोडावी लागेल का? प्रभुपाद: तुम्हाला या वाईट सवयी सोडून द्याव्या लागतील आणि हा मंत्रजप करावा लागेल, हरे कृष्ण , बस .

स्त्री प्रश्नकर्ता : मला काही आर्थिक मदत द्यावी लागेल का? प्रभुपाद: नाही, ती तुमची स्वताची इच्छा असेल. आपण आम्हाला देऊ इच्छित असाल तर ठीक आहे नाहीतर, आम्हाला काही हरकत नाही.

स्त्री प्रश्नकर्ता : माफ करा, मला समजले नाही. प्रभुपाद: आम्ही कोणाच्याही आर्थिक योगदानावर अवलंबून नाही . आम्ही देवावर कृष्णावर अवलंबून आहोत .

स्त्री प्रश्नकर्ता : तर मला काही कुठलीही आर्थिक मदत द्यावी लागणार नाही ? प्रभुपाद: नाही.

स्त्री प्रश्नकर्ता : हि मुख्य गोष्टींपैकी एक आहे का जी एका खऱ्या गुरूला फसव्या गुरूकडून वेगळी ठरवते ?

प्रभुपाद: होय. एक खरा गुरू हा व्यवसायिक माणूस नसतो .