MR/Prabhupada 0323 - हंसांचा समाज निर्माण करत आहोत, कावळ्यांचा नव्हे



Lecture on SB 3.25.12 -- Bombay, November 12, 1974

आता हे भौतिक जीवन आहे, पवर्ग. त्यामुळे जर तुम्हाला हे जीवन संपवायचे असेल, तर त्याला म्हणतात अपवर्ग. त्यामुळे येथे म्हटले आहे अपवर्गवर्धनम् ,मुक्तीमध्ये कशाप्रकारे आवड वाढवता येईल. लोक इतके मंद झाले आहेत, की त्यांना मुक्तीचा अर्थच समजत नाही. त्यांना समजत नाही. अगदी पशूंप्रमाणे. तो... जर एखाद्या पशूला सांगितले, "येथे मुक्ती आहे," तर त्याला काय समजेल? त्याला ते समजणार नाही. ते त्याच्यासाठी शक्य नाही. त्याचप्रमाणे, आताच्या काळात मनुष्य समाज हाही अगदी पशूंप्रमाणे झाला आहे. त्यांना माहीत नाही अपवर्गाचा किंवा मुक्तीचा अर्थ काय आहे. त्यांना माहीत नाही. पण एक वेळ अशी होती, जेव्हा लोकांना समजत असे की हा मानवदेह अपवर्ग प्राप्त करण्यासाठी मिळाला आहे. अपवर्ग, प, फ, ब, भ आणि म यांच्या कार्यातून मुक्त होणे. त्याला म्हणतात अपवर्गवर्धनम्. त्यामुळे देवहूतीने विचारलेले प्रश्न व त्यांची उत्तरे, जी त्यांना कपिलदेव पुढे देतील, अपवर्गवर्धनम् आहेत. तेच महत्त्वाचे आहे. सर्व वेदांची तीच शिकवण आहे. तस्यैव हेतोः प्रतयेत कोविदः. अपवर्ग प्राप्त करण्यासाठीच सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाने आपल्या परीने सर्वाधिक प्रयत्न करायला हवेत. "आणि माझ्या पोटापाण्याचे काय?" पोटापाण्यासाठी शास्त्र नाही सांगत, "तुम्ही पोटापाण्यासाठी प्रयत्न करा." शास्त्र म्हणतात, "ते येईल. ते सर्वकाही येथेच आहे. ते येईल." पण आपल्याला मुळीच असा विश्वास नाही की, "भगवंतांनी दिलेले आहे..., ते पशूंना, पक्ष्यांना, वनस्पतींना, प्राण्यांना, सर्वांना अन्न देत आहेत, मग ते मला का देणार नाहीत? त्याऐवजी मी माझा वेळ अपवर्गासाठी खर्ची घातला पाहिजे." त्यांना काहीही विश्वास नाही. त्यांना तसे शिक्षणच प्राप्त झालेले नाही. त्यामुळेच चांगली सोबत आवश्यक आहे, कावळ्यांची नव्हे, हंसांची सोबत. मग अशी बुद्धी प्राप्त होते. त्यामुळे हे कृष्णभावनामृत आंदोलन म्हणजे आपण हंसांचा समाज निर्माण करत आहोत, कावळ्यांचा नाही. कावळ्यांचा नव्हे. यात कावळ्यांना काहीच आवड नाही. त्यांना खरकट्या कचऱ्याची आवड असते. त्यांना त्याची आवड असते. पुनः पुनश्चर्वितचर्वणानाम् । (श्री. भा. ७.५.३०). पुनः पुनश्चर्वितचर्वणानाम्. ज्याप्रमाणे आपण काहीतरी फेकून देतो... खाल्यानंतर आपण पाला फेकून देतो. अन्नाचे काहीतरी उष्टे असते, आणि कावळे येतात, कुत्री येतात. त्यांना आवड असते. ते असे म्हणणार नाहीत... एक बुद्धिमान मनुष्य तेथे जाणार नाही. परंतु हे कावळे व ही कुत्री तेथे जातात. त्यामुळे हे जग तसेच आहे. पुनश्चर्वितचर्वणानाम् । (श्री. भा. ७.५.३०). चावलेलेच चावणे. ज्याप्रमाणे तुम्ही एक ऊस चावून खातात आणि त्यानंतर त्याला रस्त्यावर फेकून देतात. पण जर कोणी पुन्हा आला व त्याने ते खाल्ले, तर तो मूर्ख आहे. त्याला हे माहीत असायला हवे, "या उसातून रस काढून घेण्यात आला आहे. याला चावून मला काय भेटेल?" पण तसे काही पशू आहेत. त्यांना पुन्हा चावावेसे वाटते. त्यामुळे आपला हा भौतिक समाज म्हणजे चावलेले चावणे. एक पिता त्याच्या मुलाला उपजीविकेसाठी शिक्षण देतो, त्याचे लग्न लावून देतो, व त्याला स्थिर करतो, पण त्याला हे माहीत असते की, "हे सर्वकाही, पैसा कमावणे व लग्न करणे, मुले जन्माला घालणे, हे सर्वकाही मी केलेले आहे, पण मी संतुष्ट झालो नाही. मग मी माझ्या मुलाला या कामात का गुंतवत आहे?" याला म्हणतात चावलेले चावणे. तीच गोष्ट चावणे. "मी या कामाने संतुष्ट झालेलो नाही, पण मग मी माझ्या मुलालाही त्यात का गुंतवत आहे?" खरा पिता तो असतो जो त्याच्या मुलाला चावलेले चावू देत नाही. तो खरा पिता असतो. पिता न स स्याज्जननी न सा स्यात्, न मोचयेद्यः समुपेतमृत्युम् । हे खरे निरोधक आहे. एक पिता, एक पुरुष, त्याने पिता होण्याची इच्छा बाळगू नये, एका स्त्रीने माता होण्याची इच्छा बाळगू नये, जोपर्यंत ते त्यांच्या मुलांना मृत्यूच्या जाळ्यातून वाचवण्यास सक्षम असत नाहीत. हेच मातापित्यांचे कर्तव्य आहे.