MR/Prabhupada 0325 - हे कृष्णभावनामृत आंदोलन पसरविण्याचा प्रयत्न करा, हीच तुमची साधना आहे



Class in Los Angeles -- Los Angeles, November 15, 1968

त्यामुळे कृष्णभावनामृत फारच चांगले आहे. हीच चाचणी आहे. कोणताही माणूस येऊन या सर्व मुलांना विचारू शकतो की त्यांना कसे वाटत आहे. जर त्यांना काही दिव्य आध्यात्मिक समाधान प्राप्त होत नसेल, तर मग ते सर्वकाही सोडून कृष्णभावनाभावित कीर्तनात मग्न कसेकाय असू शकतात? त्यामुळे हीच चाचणी आहे. नैषां मतिस्तावदुरुक्रमाङ्घ्रिम् । मतिस्तावद्. मतिस्तावदुरुक्रमाङ्घ्रिम्. उरुक्रमाङ्घ्रिम्. उरुक्रम. कृष्णांचे दुसरे नाव उरुक्रम आहे. उरुक्रम म्हणजे... उरु म्हणजे खूप कठीण, आणि क्रम म्हणजे पावले. जसे श्रीकृष्णांनी त्यांच्या वामन अवतारात त्यांची पावले अवकाशापर्यंत नेली. त्यामुळे त्यांचे नाव उरुक्रम आहे. तर कोणीही त्याचे मन श्रीकृष्णांच्या चरणकमलांवर स्थिर करू शकत नाही जोपर्यंत महीयसां पादरजोsभिषेकं निष्किञ्चनानां न वृणीत यावत् । ते तोपर्यंत शक्य नाही जोपर्यंत त्याला एखाद्या अशा निष्किंचन व्यक्तीच्या चरणकमलांच्या धुळीला स्पर्श करण्याची संधी प्राप्त होत नाही, ज्याला कोणतीही भौतिक वासना नाही; महीयसाम्, आणि ज्याचे जीवन केवळ श्रीकृष्णांना समर्पित आहे. ज्या क्षणी तो अशा व्यक्तीच्या संपर्कात येतो, त्याच क्षणी त्या व्यक्तीच्या कृपेने त्याला कृष्णभावनामृत प्राप्त होते. दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने नाही. नैषां मतिस्तावदुरुक्रमाङ्घ्रिम् (श्री. भा. ७.५.३२). आणि याची चाचणी ही असेल की स्पृशत्यनर्थागमो यदर्थः महीयसां पादरजोsभिषेकं निष्किञ्चनानां न वृणीत यावत् । हीच चाचणी आहे, आणि हाच एका अधिकारी व्यक्तीकडे जाण्याचा आणि त्यांच्याकडून त्यांच्या दयेने व कृपेने कृष्णभावनामृत प्राप्त करण्याचा मार्ग आहे. परंतु ज्याक्षणी कोणी ते प्राप्त करतो, तत्क्षणीच त्याची भौतिक आसक्तींतून मुक्ती सुरू होते. तत्क्षणीच, तत्क्षणीच. आणि जसजशी तो प्रगती करत जातो, तसतसे त्याचे जीवन उत्कृष्ट होत जाते. आता एक गोष्ट... कोणी विचारू शकतो, जर एखाद्याने भावनेच्या भरात कृष्णभावनेचा स्वीकार केला, परंतु तो त्याला पूर्ण करू शकला नाही. याचा परिणाम काय होईल? हेसुद्धा श्रीमद्भागवतात दिलेले आहे. त्यक्त्वा स्वधर्मं चरणाम्बुजं हरेः (श्री. भा. १.५.१७). स्वधर्मम्. स्वधर्म म्हणजे प्रत्येकाचे काहीतरी विशिष्ट कर्तव्य असते. प्रत्येकाचेच. तर मग जर कोणी त्याचे ते विशिष्ट कर्तव्य सोडून जर तो, त्यक्त्वा स्वधर्मम्... जसे हे मुलगे व या मुली, ते येथे येतात. ते कशाततरी व्यग्र होते, परंतु एकाएकी त्यांनी सर्वकाही सोडून दिले व ते या कृष्णभावनामृत आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे त्यांच्यासाठी, भागवत म्हणते, त्यक्त्वा स्वधर्मम्... स्व म्हणजे स्वतःचे, कार्य, धर्म. आता येथे धर्माचा अर्थ धार्मिक संप्रदाय असा नाही. कर्तव्यकर्म. त्यक्त्वा स्वधर्मं चरणाम्बुजं हरेः । जर या कृष्णभावनामृत संघाची काही व्याख्याने ऐकून तो निर्णय करतो, "आता मी कृष्णभावनामृताचा प्रारंभ करायला हवा," आणि त्याची कर्तव्ये व कार्ये सोडून देतो. त्यक्त्वा स्वधर्मं चरणाम्बुजं हरेर्भजन्नपक्वोsथ पतेत्ततो यदि (श्री. भा. १.५.१७). भजन्न्. आता तो कीर्तन व नियमपालनास सुरुवात करतो, पण अचानक, तो अपयशी ठरतो. तो अपयशी ठरतो. तो पालन करू शकत नाही. काही कारणामुळे किंवा परिस्थितीमुळे, तो अपयशी ठरतो. तर मग भागवत म्हणते, "जर तो अपयशी ठरला, तरी त्यात वाईट काय आहे?" पहा. जरी तो त्याच्या कृष्णभावनेतील अपरिपक्व विकासामुळे अपयशी ठरला, तरी, तो काहीही गमावत नाही. आणि भागवत म्हणते, को वार्थ आप्तोsभजतां स्वधर्मतः. आणि जो त्याच्या कर्तव्यकर्मांचे अतिशय कठोरपणे पालन करतो, त्याला काय लाभ प्राप्त होतो? तो केवळ गमावतो कारण जीवनाचे खरे उद्देश्य काय आहे हेच तो जाणत नाही. पण येथे, जर कोणी कृष्णभावनेचा स्वीकार करेल, केवळ काही दिवस आमच्यासोबत राहील, तरी त्याच्यावर कृष्णभावनेचा असा प्रभाव पडेल की पुढच्या जन्मात तो पुन्हा, पुन्हा, पुन्हा प्रयत्न करेल. त्यामुळे तो काहीच गमावत नाही. कृष्णभावनेचे हे केवळ एकच औषध त्याला एक दिवस कृष्णभावनेत परिपूर्ण बनवेल, आणि तो नक्कीच त्याच्या मूळ घरी, भगवद्धामाला परत जाईल. त्यामुळे या कृष्णभावनामृत आंदोलनाला पसरवण्याचा प्रयत्न करा. आणि हीच तुमची साधना आहे, हीच तुमची तपस्या आहे, हेच तुमचे व्रत आहे. कारण तुम्हाला खूप विरोधी तत्त्वांचा सामना करावा लागेल. तुम्हाला त्यांच्याशी लढावे लागेल. ही एक तपस्याच आहे. तुम्ही इतक्या अपमानाला, त्रासाला, असुविधांना, स्वतःकडे केलेल्या दुर्लक्षाला सहन करत आहात. तुम्ही पैसा वगैरे सर्वच गोष्टींचा त्याग केला आहे - पण ते व्यर्थ जाणार नाही. खात्रीशीर राहा. ते व्यर्थ जाणार नाही. कृष्ण, मला म्हणायचे आहे, तुम्हाला परिपूर्ण मोबदला देतील. तुम्ही केवळ कृष्णभावनेत कार्यरत रहा. खूप खूप धन्यवाद.