MR/Prabhupada 0456 - एक जिवंत अस्तित्व जी शरीरात हालचाल करते, ती सर्वोच्च उर्जा आहे



Lecture on SB 7.9.6 -- Mayapur, February 26, 1977

भगवद्गीता मध्ये म्हटले आहे की (BG ७.४) हे भौतिक उन्नती केलेले लोक, शास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि तर्कशास्त्री ते भौतिक पंच महाभूते यांचे शी संबंधात बघतात की पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश जास्तीत जास्त मन, मानसिकता किंवा बुध्दी. बस ते त्यांच्या विद्यापीठ, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थेत व्यवहार करीत आहेत. ते या घटक, साहित्याशी संबंधित आहेत. त्यांना अध्यात्मिक ज्ञान नाही भगवद्गीता मधून आपल्याला माहिती मिळते की "हे आठ घटक, ते निकृष्ट आहेत." कारण ते निकृष्ट दर्जाचे घटकांशी संबंधित आहे तर त्यांचे ज्ञान पण निकृष्ट च आहे हे सत्य आहे. मी आरोप करत नाही. नाही. त्यांना माहिती नाही मोठे मोठे प्रोफेसर ते सांगतात की हे शरीर संपले ... त्यांना हे माहीत नाही की दुसरे शरीर सुद्धा आहे सूक्ष्म sharir- मन, बुध्दी, अहंकार. त्यांना हे माहिती नाही ते विचार करतात की पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश, हेच "संपले. तुम्ही शरीराला पुरा नाही तर जाळून टाका, संपले, सारे काही संपले दुसरे शरीर कोठे आहे? त्यांना याचे ज्ञान नाही त्यांना सूक्ष्म शरीर, पृथ्वी, जल जे आत्मा ला सोबत नेतात या बद्दल सुद्धा ज्ञान नाही तर त्यांना आत्मा बद्दल काय माहीत असणार म्हणून कृष्ण भगवद्गीता मध्ये सांगतात ही तत्वे, मन, बुध्दी, अहंकार ही माझी भिन्न भिन्न शक्ती आहेत आणि अपरेयं, ती निकृष्ट आहे, अजून एक श्रेष्ठ शक्ती आहे ... ते विचारणार की आता हे काय आहे आपल्याला फक्त हीच तत्वे माहीत आहे. दुसरी श्रेष्ठ शक्ती कोणती? ... ८ किंवा ५ भौतिक घटक सोडून अजून कोणती श्रेष्ठ शक्ती त्यांना माहिती च नाही हे त्यांचा अज्ञान आहे पहिल्यांदाच त्यांना काही ज्ञान मिळत आहे, भगवद्गीता जशी आहे तशी त्या पासून ते समजू शकतात, की श्रेष्ठ शक्ती आहे, जीव भूत जे जैविक घटक शरीराला हलावते, ती श्रेष्ठ आहे म्हणून त्यांना काही ज्ञान नाही, आणि कोणी माहिती सुद्धा करून घेण्याचा प्रयत्न करत नाही त्यांचे विद्यापीठ किंवा संस्था मध्ये. म्हणून ते मुढ आहेत त्यांना त्यांचे भौतिक ज्ञानाचे खूप अभिमान असेल, पण वैदिक ज्ञान नुसार ते मूढ आहेत जर कोणी श्रेष्ठ शक्ती, प्रकृती समजू शकत नसेल तर ते भगवंतांना कसे समजणार? शक्यच नाही भगवान आणि श्रेष्ठ शक्ती यांचा संबंध समाजाने म्हणजे च भक्ती आहे हे कठीण आहे. (BG ७.३) सिद्ध ये म्हणजे श्रेष्ठ शक्ती समजणे. तेच सिद्धी आहे त्या नंतर कोणी तर कृष्ण ला समजू शकणार हे खूप कठीण आहे., या युगात तर जास्तच. (SB १.१.१०) ते मंद आहेत म्हणजे त्यांना यात रस वाटत नाही किंवा कमी रस वाटतो, ते हळू आहेत. हे सर्वात महत्वाचे ज्ञान आहे हे ते समजू शकत नाहीत तुम्हाला हे सर्वात आधी माहीत पाहिजे की अथातो ब्रम्ह जिज्ञासा, हे श्रेष्ठ ज्ञान पाहिजेच. पण सारे लोक त्या कडे दुर्लक्ष करत आहेत. या शरीरात फिरणारी कोणती गोष्ट आहे याबद्दल देखील कोणतीही चौकशी नाही. ते याची विचारणा करीत नाहीत आणि समजतात की आपोआप, काही संयुक्त मिश्रणामुळे ते अस्तित्वात आहेत....त्यांना जर कोणी आव्हान केले तर की "तुम्ही हे हे रसायने घ्या आणि जीवित करून दाखवा" ते सांगणार की, "ते आम्ही करू शकत नाही" हा काय मूर्खपणा आहे जर तुम्ही जीवित करू शकत नाही, तर तुम्ही असे मूर्खपणाचे बोल का बोलतात की, "रासायनिक सम्मिश्रणामुळे जीवन बनते?" आमचे डॉक्टर स्वरूप दामोदर जे कॅलिफोर्निया विद्यापीठात आहेत एक मोठा प्रोफेसर रासायनिक उत्क्रांतीवर व्याख्यान देण्यासाठी आला आणि त्याने लगेच त्याला आव्हान दिले "जर मी तुम्हाला रसायने दिली तर आपण जीवन निर्माण करू शकता?" ते म्हटले की, "ते शक्य नाही". ही त्यांची अवस्था आहे ते सिद्ध करू शकत नाहीत. ते करू शकत नाहीत.