MR/Prabhupada 0458 - हरे कृष्ण जप - आपल्या जीभेने श्रीकृष्णांना स्पर्श करणे
Lecture on SB 7.9.6 -- Mayapur, February 26, 1977
नृसिंह देवांनी प्रल्हाद महाराजांचे डोक्याला स्पर्श केला तुम्ही सुद्धा हे मिळवू शकतात ते कसे काय? नरसिंह देव येथे नाहीत, कृष्ण येथे नाहीत ते आहेत. कसे? नाम रूपे कली काळे कृष्ण अवतार कृष्ण त्यांचे नाम मध्ये आहेत हरे कृष्ण मधले कृष्णा हे नाव कृष्ण पासून वेगळे आहे, असे समजू नका परिपूर्ण. कृष्ण विग्रह, नाम कृष्ण, स्वतः कृष्ण हे सगळे काही सत्य आहेत. काहीही वेगळेपण नाही या युगात फक्त नाम घेण्याने ... फक्त कृष्णाचे पवित्र नाम घेण्याने ... कृष्णाचे नाम हे कृष्णा पासून वेगळे असल्याचे समजू नका ते पूर्ण आहेत ... कृष्ण संबंधात सारे काही पूर्ण च आहे इशोपनिषदात संपूर्णतः विश्लेषण केलेले आहे. तुम्ही वाचले आहेत च. तर हे पवित्र कृष्ण नाम सोडू नका प्रल्हाद महाराजांना जो फायदा झाला तो तुम्हाला ही होईल नरसिंह भगवंताचा हाताचा स्पर्श. यामध्ये काहीही फरक नाही नेहमी हाच विचार करा, जेव्हा जेव्हा तुम्ही हरे कृष्णा नाम घेणार तुम्ही कृष्णाला तुमच्या जिभेने स्पर्श करत आहात तुम्हाला प्रल्हाद महाराज सारखा फायदा मिळेल आभारी आहोत