MR/Prabhupada 0461 - "मी गुरुशिवाय करू शकतो" - तो मूर्खपणा आहे



Lecture on SB 7.9.7 -- Mayapur, February 27, 1977

कदाचित तुम्हाला माहिती असेल, आपल्या कडे एक कवी होऊन गेले, रवींद्रनाथ टागोर त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ कडून खूप पुरस्कार मिळाले होते त्यानं मिळाले. ते कधी शाळेत गेले नाही, पण त्यांना डॉक्टर पदवी मिळाली तुम्ही जर विचार कराल की "मी सुधा डॉक्टर ही पदवी शाळेत न जाता मिळवेल" हा मूर्खपणा आहे हे खास आहे. तसेच तुम्ही नक्कल करण्याचा प्रयत्न करू नका साधना भक्ती ला अनुसरून चला शास्त्र मध्ये हे नियामक तत्त्वे दिली आहेत ती पाळा गुरू हे मार्गदर्शक आहेत, शास्त्र भरपूर आहेत. म्हणून तुम्ही नित्य सिद्ध किंवा कृपा सिद्ध असेल तरी, तुम्ही नियामक तत्वे पाळली च पाहिजे ते खूप धोकादायक आहे. तसे करू नका आपण चैतन्य महप्रभु चे उपदेश पाळले पाहिजे चैतन्य माहप्रभू हे स्वतः भगवंत असून ही त्यांनी गुरू स्वीकारला होता. त्यांचे गुरू कोण होते? ते सर्वांचे गुरू आहेत, तरी सुद्धा त्यांनी ईश्वर पुरी यांना त्यांचे गुरू म्हणून स्वीकारले होते स्वतः कृष्ण यांनी सांदिपनी ऋषी ना गुरू स्वीकारले होते हे दाखवण्यासाठी की तुम्ही गुरू शिवाय प्रगती करू शकत नाही सर्वात पहिले कार्य म्हणजे गुरू स्वीकारणे होय ... "मी ऐवढा प्रगत आहे की मला गुरू ची गरज नाही. मी गुरू शिवाय करू शकतो" हा विचार करू नका. हा मूर्खपणा आहे. ते शक्य च नाही. ... ... ... जर तुम्ही दिव्य अध्यात्मिक ज्ञान समजून घेण्याची इच्छा करत असाल तर तुम्हाला एक गुरू असलाच पाहिजे. चैतन्य माहाप्रभू सारखे गुरू हे स्वतः बनवू शकत नाही. वेदिक ज्ञान मध्ये असे एकदाही झाले नाही की आणि आजकाल, इतके बदमाश, ते कोणत्याही अधिकाराशिवाय गुरु होत आहेत. ते गुरू नाहीत. तुम्ही अधिकृत असायला हवेत. परंपरा खंडित झाली की सारे संपले अध्यात्मिक सामर्थ्य संपले तुम्ही गुरू सारखा परिवेश धारण करू शकता, मोठे मोठे भाषण देऊ शकतात पण त्यांचे परिणाम काहीही होणार नाहीत हे शास्त्र आहे. म्हणून प्रल्हाद महाराज हे आपले गुरू आहेत. ते साधारण व्यक्ती नाहीत.. "ते तर ५ वर्षाचे बालक होते, त्यांना काही ज्ञान नाही" असे विचार करू नका नाही. ते नित्य सिद्ध गुरू आहेत आणि त्यांची कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करायला पाहिजे वैष्णव ठाकूर आहेत ... हा नम्रतेचा रस्ता आहे, "ओ वैष्णव ठाकूर" सारे वैष्णव हे ठाकूर आहेत. ते साधारण व्यक्ती नाहीत म्हणून आपण असे संबोधतो की भक्तिविनोद ठाकूर, भक्तीसिधांत सरस्वती ठाकूर म्हणून वैष्णव, प्रल्हाद ठाकूर आपण नेहमी त्यांची प्रार्थना केली पाहिजे भक्ती विनोद ठाकूर यांचे एक गीत आहे प्रिय वैष्णव ठाकूर, मला तुम्ही तुमचा पाळलेला कुत्रा समजा." जसा कुत्रा मालकाचे सारे काही ऐकतो आपल्याला हा धडा कुत्राकडून शिकला पाहिजे, मालकाशी कसे विश्वासू राहावे. ही शिकवण आहे. तुम्ही प्रत्येक कडून शिकू शकतात महा भागवत, ते सर्वांना गुरू स्वीकारता, काही तरी शिकण्या साठी जीवन भार, मालकाशी कसे विश्वासू राहावे, हे आपण कुत्र्याकडून शिकू शकतो मलकासाठी कुर्त्याने प्राण दिले, याची अनेक उदाहरणे आहेत आपण वैष्णवांचे कुत्रा व्हावे ...