MR/Prabhupada 1059 - प्रत्येक व्यक्तीचा भगवंताबरोबर एक विशिष्ट संबंध आहे



660219-20 - Lecture BG Introduction - New York


ज्या वेळी एखादा भगवंताचा भक्त होतो, त्या वेळी त्याचा भगवंता बरोबर साक्षात संबंध स्थापित होतो. हा एक अत्यंत गहन विषय आहे. परंतु थोडक्या सांगायचे तर, भक्ताचा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याबरोबर पाच निरनिराळ्या प्रकरांपैकी कणत्याही एक प्रकाराने संबंध स्थापित होऊ शकतो. एखादा निष्क्रिय अवस्थेमधील भक्त असू शकतो. एखादा सक्रिय अवस्थेमधील भक्त असू शकतो. एखादा मित्र या नात्याने भक्त असू शकतो. एखादा माता किंवा पिता या नात्याने भक्त असू शकतो. आणि एखादा माधुर्य भावात भक्त असू शकतो.

अर्जुनाचा भगवंता बरोबर सखा या नात्याने संबंध होता. भगवंत मित्र होऊ शकतात. खचीत, मित्र या सख्य भावामध्ये आणि भौतिक जगात आढळून येणार्‍या मैत्री मध्ये विशाल फरक आहे. ही मैत्री दिव्य असते व... अस नाही की सर्वांनाच भगवन्ताशी संबंध प्राप्त होतो. प्रत्येक व्यक्तीचा भगवंताबरोबर एक विशिष्ट संबंध आहे. आणि या संबंधाची पुनर्जागृती भक्तिमय सेवेच्या पूर्णत्वाने होते. परंतु आपल्या स्थितीत भगवंताचेच नव्हे तर त्यांच्या बरोबर असणार्‍या शाश्वत संबंधाचे सुद्धा आपल्याला विस्मरण झाले आहे. कोट्यावधी जीवांपैकी प्रत्येक जिवाच्या भगवंतांबरोबर विशिष्ट असा शाश्वत संबंध असतो. यालाच 'स्वरुप' असे म्हटले जाते. प्रेममयी सेवेद्वरे एखादा स्वरुपस्थिती पुन्हा जागृत करून घेऊ शकतो. व यालाच 'स्वरूपसिद्धी' म्हणजे एखाध्याच्यामूळ स्थितीचे परिपूर्णत्व असे म्हटले जाते. म्हणून, अर्जुन हा भक्त होता आणि त्याचा भगवंतांबरोबेर सख्यभावामध्ये नित्य संबंध होता.

आता, ही भगवद्गीता अर्जुनाला स्पष्टपणे सागितली गेली, आणि ती अर्जुनाने कशी स्वीकारली? हे जाणणे आवश्यक आहे. अर्जुनाने केलेल्या स्वीकृतीची पद्धत दहाव्या अध्यायामध्ये सांगितली आहे. जसे :

अर्जुन उवाच
परं ब्रह्म परं धाम
पवित्रं परमं भवान्
पुरषं शाश्वतं दिव्यम
अादि देवम अजं विभुम्
अाहुस् त्वाम ऋषय: सर्वे
देवर्षिर नारदस तथा
असितो देवलो व्यास:
स्वयं चैव ब्रवीषि मे
(भ गी १०।१२-१३)
सर्वम एतद ऋतम् मन्ये
यन् माम् वदसि केशव
न हि ते भगवन व्यक्तिमं
विदुर देवा न दानवा:
(भ गी १०।१४)

आता, अर्जुन म्हणतात, पुरुषोत्तम भगवान यांच्याकडून भगवद्गीतेचे श्रावण केल्यानंतर अर्जुनाने श्री कृष्णांना परं ब्रह्म म्हणून स्वीकारले. ब्रह्म. प्रत्येक जीव ब्रह्म आहे, पण परम-जीव किंवा पुरुषोत्तम भगवान हे परम ब्रह्म आहेत. आणि परं धाम. परम धाम म्हणजे भगवंत हे सर्व गोष्टींचे परम आश्रय स्थान आहेत. आणि पवित्रं. पवित्रं म्हणजे ते शुद्ध आणि भौतिक विकरांपासून मुक्त आहेत. त्यांना पुरुषं असे संबोधले आहे. पुरुषं म्हणजे ते सर्व श्रेष्ठ भॉक्ता आहेत; शाश्वतं, शाश्वत म्हणजे अनादी कालापासून, ते पहिले व्यक्ती आहेत. दिव्यम म्हणजे अलौकिक; आदी देवं म्हणजे पुरुषोत्तम भगवान. अजं म्हणजे अजन्मा आणि विभूम म्हणजे सर्वश्रेष्ठ.

आता काहीजण विचार करतील की, कृष्ण हा अर्जुनाचा मित्र असल्यामुळे अर्जुन त्याची खुशामत करण्यासाठी असे सांगत आहे. पण भगवद्गीतेच्या वाचकांच्या मनातील हा संशय काढून टाकण्यासाठी आणि ही स्तुती सप्रमाण आहे ते दाखवण्यासाठी अर्जुन सांगतो की, श्री कृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत, ही गोष्ट फक्त तोच नव्हे तर, नारद, असित, देवल, व्यास देव इत्यादी थोर अधिकारी, महर्षी सुद्धा मान्य करतात. सर्व आचार्यांनी स्विकरलेल्या वैदिक ज्ञानाचा प्रसार करणारे हे सर्व श्रेष्ठ महर्षी आहेत. त्यांना सर्व आचार्यांनी स्वीकारलेले आहे. म्हणून अर्जुन श्री कृष्णांना सांगतो की, "तुम्ही जे सांगत आहात, त्याचा मी पूर्ण सत्य म्हणून स्वीकार करतो."