MR/Prabhupada 1060 - जोपर्यंत एखादा नम्र भावाने भगवद्गीता वाचीत नाही
660219-20 - Lecture BG Introduction - New York
सर्वमेतदृतं मन्ये (भ गी १०।१४). "तुम्ही सांगितलेले सर्व सत्य म्हणून मी मान्य करतो. आणि तुमचे व्यक्तित्व समजणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे मोठ्मोठे देवता सुद्धा तुम्हाला जणू शकत नाहीत. मोठ्मोठे देवता सुद्धा तुम्हाला जणू शकत नाहीत." याचाच अर्थ असा आहे की, मानवापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती सुद्धा भगवंतांना जणू शकत नाहीत, तर मनुष्य भक्त झाल्याशिवाय भगवान श्री कृष्णांना कसे जणू शकेल?
या साठी भगवद्गीता भक्तिभावानेच स्वीकारली पाहिजे. एखाद्याने स्वत:ला आपण श्री कृष्णांच्या बरोबरीचे आहोत असे समजू नये, अथवा श्रीकृष्ण हे साधारण व्यक्ती आहेत किंवा श्रीकृष्ण हे केवळ श्रेष्ठ महापुरुष आहेत असे सुद्धा समजू नये. नाही. श्रीकृष्ण साक्षात पुरुषोत्तम भगवान आहेत. म्हणून भगवद्गीतेच्या अथवा अर्जुनाच्या म्हणण्या प्रमाणे जो भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याने श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून तरी स्वीकार केला पाहिजे. अशा नम्र भावानेच ... जोपर्यंत एखादा नम्र भावाने भगवद्गीता वाचीत नाही, किंवा ऐकत नाही, तोपर्यंत त्याला भगवद्गीता समाझायला खूप कठीण जाते. कारण भगवद्गीता हे एक महान रहस्य आहे.
तर ह्या भगवद्गीते मध्ये.. आपण सर्वेक्षण करू शकतो की भगवद्गीता आहे तरी काय? ह्या भगवद्गीतेचा उद्देश मानवजातीला अज्ञानमय भौतिक अस्तित्वातून उद्धार करण्याचा आहे. प्रत्येक मनुष्य हा नाना प्रकारच्या अडचणींमुळे त्रस्त झालेला असतो, त्याचप्रमाणे अर्जुनाला सुद्धा कुरुक्षेत्र येथे युद्ध करण्यामध्ये अडचणी होत्या. अर्जुन श्री कृष्णांना शरण गेल्यामुळे त्याला भगवद्गीता सांगण्यात आली. फक्त अर्जुन नव्हे तर आपल्यापैकी प्रत्येकजण हा भौतिक .जीवनामुळे चिंताग्रस्त आहे. असत ग्रहात... हे... आपले अस्तित्वच मुळी 'असत' वातावरणात आहे. पण खरोखर आपण कधीच अनास्थित्व नसतो. आपले अस्तित्व शाश्वत आहे, पण काही कारणासाठी आपल्याला असत वातावरणात ठेवण्यात आले आहे. असत म्हणजे 'जे अस्तित्वात नाही ते.'
आता, अनेक मनुष्यप्राण्यांपैकी जे खर्या अर्थाने आपल्या स्वरूपाविषयी, म्हणजे आपण कोण आहोत, आपल्याला अशा विचित्र परीस्थितीमध्ये का ठेवण्यात आले आहे... " मी दु:ख का भोगत आहे? " या संबंधी आपली जिज्ञासा जर जागृत झाली नाही, "मला ही दु:खे नको मी सर्व दु:खांतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, पण मी असफल झालो." हे सत्य जर मनुष्याला उमजले नाही तर त्याला खरा मनुष्य समाझता येणार नाही. या प्रकारची जिज्ञासा एखाद्याच्या मना मध्ये उत्पन्न झाल्यावरच खर्या अर्थाने मानवतेचा आरंभ होतो. या प्रकारच्या जिज्ञासेला ब्रह्मसुत्रान्मध्ये ब्रह्मजिज्ञासा असे म्हटले आहे; अथातो ब्रह्मजिज्ञासा. तोपर्यंत मनुष्याची सर्व कार्ये निष्फळ समझली पाहिजेत जोपर्यंत त्याला ही जिज्ञासा नसते. म्हणून जे जिज्ञासू असतात की, "मी दु:ख का भोगत आहे, मी कुठून आलो आणि मृत्यू नंतर मी कुठे जाणार आहे?" या प्रश्नांबद्दल जे जिज्ञासू असतात तोच भगवद्गीतेचा योग्य अभ्यासक होण्यास लायक आहे. आणि तो श्रद्धावान असला पाहिजे. श्रद्धावान. त्याला भगवंतांविषयी आदरभाव, प्रेमळ आदरभाव, असणे आवश्यक आहे. अर्जुन हा असा आदर्श व्यक्ती होता.