MR/Prabhupada 1061 - ह्या भगवद्गीतेचा विषय म्हणजे पाच मूलभूत तत्त्वांबद्दलचे ज्ञान होय



660219-20 - Lecture BG Introduction - New York


तर श्रीकृष्ण, ते अवतरित होतात. यदा यदा ही धर्मास्य ग्लानिर भवति (भ गी ४।७) फक्त आपल्या जीवनाच्या मूळ ध्येयाची पुनर्स्थापना करण्यासाठी. जेव्हा मनुष्य आपल्या जीवनाचे मूल ध्येय विसरतो, मनुष्य जीवनाचे वास्तविक ध्येय, तेव्हा त्याला धर्मास्य ग्लानि: असे म्हटले जाते. मनुष्याच्या व्यवसायात अडथळा, तर अशावेळी वास्तविक ध्येय जाणणार्‍या अनेकानेक व्यक्तींपैकी, जो जागृत आहे, जो स्वत:चे स्वरुप जणू शकतो, अशा मनुष्यसाठी ही भगवत-गीता सांगितली आहे खरे म्हणजे आपणा सर्वांना अज्ञानाच्या वघिणीने गिळंकृत केले आहे. पण भगवंत सर्व जीवान्बद्दल अत्यंत दयाळू आहेत, खास करून मनुष्यप्रण्याबद्दल, त्यांनी भगवद गीता सांगितली. आपल्या मित्र अर्जुनाला स्वतःचा शिष्य करून.

अर्जुन निश्चितच... तो भगवान श्री कृष्णांचा सखा असल्यामुळे अज्ञानाच्या पलीकडे होता. तरी सुद्धा, कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुनाला जाणूनबुजून अज्ञानात टाकले गेले जेणेकरून तो जीवनाच्या समस्यांबद्दल भगवान श्री कृष्णांना प्रश्न विचारू शकेल जेणेकरून भगवंत, मनुष्याच्या भावी पिढ्यांच्या कल्याणार्थ या समस्यांचे समाधान करून आपल्या जीवनाच्या योजनेचे निर्धारण करण्यासाठी व त्याच्या अनुसार कार्य करण्यासाठी, जेणेकरून त्याचे जीवन, मनुष्य देहाचे उद्धिष्ट, परिपूर्ण होऊ शकेल.

तर ह्या भगवद्गीतेचा विषय म्हणजे पाच मूलभूत तत्त्वांबद्दलचे ज्ञान होय. सर्वप्रथम परमेश्वराबद्दलच्या ज्ञानाचे तत्त्व. हे भगवंतांच्या विज्ञानाचे प्राथमिक अध्ययन आहे. तर भगवंतांचे विज्ञान येथे स्पष्ट केलेले आहे. त्यानंतर जीवातम्याच्या स्वरूप्सिद्धीबद्दलच्या ज्ञानाचे विवेचन केले आहे. ईश्वर आणि जीव, भगवंतांना, परमेश्वरांना, ईश्वर असे म्हणतात. ईश्वर म्हणजे नियंता. आणि जीव हा, जिवात्मा, जीवात्मे, जीवात्मे, हे ईश्वर किंवा नियंता नाहीत. ते नियंत्रित असतात. कृत्रिम रूपाने जर मी म्हटले की, "मी नियंत्रित नाही. मी स्वतंत्र आहे." हे समजूतदार मनुष्याचे लक्षण नाही. जीवात्मा सर्व प्रकाराने नियंत्रित असतो. किमान आपल्या जीवनाच्या बद्ध अवस्थेत तरी तो नियंत्रित असतो. तर ह्या भगवद्गीते मध्ये, विवेचन केले आहे, ईश्वाराबद्दल, परम नियंत्रक आणि नियंत्रित जीवात्मे यांच्या बद्दल, आणि प्रकृती, जड प्रकृती, त्यानंतर, काळ, किंवा अखिल ब्रह्मांडाची कालमर्यादा. किंवा सृष्टीचे प्रकटीकरण. आणि काळ, अथवा अनंत काळ. आणि कर्म. कर्म म्हणजे क्रियाकलाप. सर्व काही, हे अखिल विश्व निरनिराळ्या प्रकारच्या कृतींनी भरलेले आहे. विशेषत: जीवात्मे वेगवेगळ्या कृती करण्यात गुंतलेले असतात. म्हणून आपण भगवद्गीते पासून हे ज्ञान मिळविले पाहिजे, की ईश्वराचे स्वरुप काय जीव, जीवात्म्यान्ची स्वरूपास्थिती, प्रकृती, भौतिक विश्व म्हणजे काय, व ते काळाच्या प्रभावाने कसे नियंत्रित केले जाते, आणि जीवात्म्यान्ची कर्मे कोणती ?

आता ह्या पाच मूलभूत तत्त्वांपैकी, ह्या भगवद्गीतेमध्ये ह्याची स्थापना केली गेली आहे, की परमेश्वर किंवा कृष्ण किंवा ब्रह्म किंवा परमात्मा... यापैकी कोणत्याही नावाचा उपयोग करा. परंतु परम नियंत्रक. एक परम नियंत्रक आहे. तर परम नियंत्रक सर्वश्रेष्ठ आहे. आणि जीवात्मे गुणाने परम नियंत्राकाच्या समान आहेत. जसे परम नियंत्रक, भगवंत, भौतिक प्राकृतीच्या सर्व कार्यावर परमेश्वराचे नियंत्रण आहे, कसे... भगवद्गीतेच्या नंतरच्या अध्यायात सांगितले आहे की भौतिक प्रकृती स्वतंत्र नसते. ती भगवंतांच्या अध्यक्षते खाली कार्य करीत असते. मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते स चराचरम (भ गी ९।१०) "ही प्रकृती माझ्या अध्यक्षते खाली कार्य करीत आहे." मयाध्यक्षेण, "माझ्या अध्यक्षते खाली."