MR/Prabhupada 1075 - या जन्मीच्या कर्मांद्वारे आपण पुढच्या जन्माची तयारी करत आहोत



660219-20 - Lecture BG Introduction - New York

आपण या जन्माच्या कर्मानुसार पुढच्या जन्माची तयारी करत आहोत भगवंत म्हणतात

अंत काले च मां एव स्मरण मुक्त्वा कलेवरम (भ गी ८।५) ।

जो हे भौतिक शरीर फक्त कृष्णाचे , परम परमेश्वराचे स्मरण करत त्याग करतो , त्याला सद्चिद- आनंद स्वरूप शरीराची प्राप्ती होते सच्चिदानंदविग्रह ( ब्र स ५।१) भौतिक जगात हे शरीर त्याग करण्याची आणि दुसरे शरीर प्राप्त करण्याची प्रक्रिया सुद्धा सुयोजित आहे | मनुष्य पुढच्या जन्मी कोणते शरीर घेणार हे निश्चित झाल्यावर त्याचा मृत्यू होतो | पण ते उच्च अधिकारी ठरवतात | जसे आपल्या कामानुसार आपल्याला पदोन्नती किंवा अवनती मिळते | तसेच आपल्या कर्मानुसार आपण ... या जन्माचे कर्म , या जन्माच्या गतीविधी पुढच्या जन्माची पूर्व तयारी असते । आपण या जन्मनुसार पुढच्या जमाची तयारी करत आहोत । तर आपण ह्या जन्म पुढच्या पदोन्नतीसाठी परमेश्वराचे धाम मिळवण्यासाठी तयारी करू शकतो , मग नक्कीच , इथून गेल्यावर , या देहाचे त्याग केल्यावर ... भगवंत म्हणतात , यः प्रयाती ,तो जो जातो स मद भावं याति (भ गी ८।५)

मद भावं..... त्याला भागवंतासारखेच दिव्य शरीर किंवा समान दिव्य स्वरूप प्राप्त होते। आता , तइथे विविध प्रकारचे पारलौकिक जन आहेत , जसे आपण आधीच वर समजावले आहे । ब्रह्मवादी, परमात्मावादी आणि भक्त । आध्यात्मिक जगात किंवा ब्रह्म ज्योतिमध्ये याअध्यात्मिक ग्रह आहेत , असंख्या आध्यात्मिक ग्रह , आपण आधीच चर्चा केली आहे । आणि त्यातले अनेक ग्रह फार दूर आहेत , या भौतिक जगाच्या सृष्टीच्या फार पलीकडे । हे भौतिक जगत आहे , एकांशेन स्थितो जगत (भ गी १०।४२) ।

हे पूर्ण सृष्टीच्या एक चतुर्थांश भागा एवढेच आहे । तीन चतुर्थांश भाग आध्यात्मिक जगाचा भाग आहे आणि एक चतुर्थ भागात अशी लाखो विश्वे आहेत जे आपण सध्या अनुभवत आहोत । आणि आशा एका विश्वात लाखो ग्रह आहेत । तर लाखो करोडो सूर्य आणि तारे आणि चंद्र या भौतिक जगात आहेत । पण हे सर्व भौतिक जग संपूर्ण सृष्टीच्या फक्त एक चतुर्थ भागाएवढे आहे । तीन चतुर्थ भाग आध्यात्मिक आकाशात आहे । आता , हे मद-भावम , जो परम ब्राह्मणमध्ये विलीन होण्याची आशा करतो , ते परमेश्वराच्या ब्रह्म ज्योतिर मध्ये विलीन होतात । मद-भावम म्हणजे ती ब्रह्म ज्योती तसेच ब्रह्म ज्योतितले अध्यात्मिक ग्रह । आणि ते भक्त ज्यांना भगवंताच्या सानिध्याचा आनंद हवा आहे , ते वैकुंठ ग्रहात प्रवेश करतात । तिथे असंख्या वैकुंठ ग्रह आहेत आणि भगवंत , श्री कृष्ण , त्यांच्या पूर्ण नारायण रूप विस्तारातून , त्यांच्या चार हातांनी आणि विविध नावांनी युक्त , प्रद्युम्न , अनिरुद्ध आणि माधव , गोविंद .... अशी असंख्य नवे आहेत या चतुर्भुज नारायणाची । त्यातील एक ग्रह , जो आहे मद भावम , तो सुद्धा आध्यात्मिक स्वरूपात आहे । तर कुणीही जो आयुष्याच्या शेवटी , ब्रह्म ज्योतिर चे स्मरण करून किंवा परमात्म्याचे ध्यान एकाग्र करून , किंवा विचार करतो श्री कृहन हे परम ईश्वर स्वरूप आहेत । दोन्ही बाबतीत, ते अध्यात्मिक आकाशात प्रवेश करतात | परंतु केवळ भक्त, ज्यांनी भगवंताशी जवळचा संपर्क साधला आहे, ते वैकुंठ ग्रहांत किंवा गोलोक वृंदावन ग्रहामध्ये प्रवेश करतात | भगवंत म्हणतात ,

य: प्रयाति स मद भावं याति नासत्यत्र संशय: (भ गी ८।५)) । यात काही शंका नाही. आपण अविश्वास ठेवू नये तर आपण संपूर्ण जीवनभर भगवद्गीते वाचन करत आहोत परंतु जेव्हा भगवंत आपल्याला अनाकलनीय असे काहीतरी सांगतात , तेव्हा आपण ते नाकारतो | भगवत-गीता वाचनाची ही प्रक्रिया नाही. जसे अर्जुन म्हणाला सर्वम एतं ऋतम मन्ये (भ. गी. १०. १४) ।, "तुम्ही जे काही बोलला आहात , त्या सर्ववावर मला विश्वास आहे" | त्याचप्रमाणे ऐका , ऐकणे. भगवंत म्हणतात की मृत्यूच्या वेळी, जो कोणी त्याचा विचार करतो, ब्राह्मण म्हणून किंवा परमात्मा किंवा ईश्वर म्हणून , निश्चितपणे तो आध्यात्मिक आकाशात प्रवेश करतो आणि यात काही शंका नाही | एखाद्याने यावर अविश्वास ठेवू नये | आणि प्रक्रिया म्हणजे, सामान्य नियम देखील भगवद् गीतेमध्ये सांगितला आहे, कसे कोणी हे करू शकता, कसे अध्यात्मिक राज्यात प्रवेश करणे शक्य आहे फक्त मृत्यूच्या वेळी परमेश्वराचे स्मरण करून | सामान्य प्रक्रियेचा देखील उल्लेख केला आहे :

यं यं वापि स्मरण भावं
त्यजति अंते कलेवरम
तं तमेवैति कौन्तेय
सदा तद भाव भावित:
(भ गी ८।६)