MR/Prabhupada 1076 - मृत्यूच्या वेळी आपण इथे राहू शकतो किंवा अध्यात्मिक जगात स्थानांतरण करू शकतो



660219-20 - Lecture BG Introduction - New York

मृत्यूच्या वेळी आपण इथे राहू शकता, किंवा अध्यात्म विश्वामध्ये स्थानांतरित करू शकता विविध भाव आहेत आता हे भौतिक स्वरूप हे सुद्धा एक भाव आहे , आपण आधीच स्पष्ट केले आहे, की हे भौतिक स्वरूप देखील परमेश्वराच्या एका ऊर्जेचे प्रतीक आहे . विष्णु पुराणामध्ये परमेश्वराच्या एकूण शक्तींचा सारांश देण्यात आला आहे .

विष्णुशक्ति: परा प्रोक्ता
क्षेत्रज्ञाख्या तथा पर
अविद्याकर्मसंज्ञान्या
तृतीया शक्तिरिष्यते:(चै च मध्य ६।१५४)

सर्व ऊर्जा , परास्य शक्तिर विविधैव श्रुयते (चै च मध्य १३।६५) सर्वशक्तिमान परमेश्वराच्या भगवान विविध , असंख्य ऊर्जा आहेत , ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही . पण महान ज्ञानी , ऋषी, मुक्त जीव त्यांनी याचा अभ्यास केला आहे आणि त्यांनी संपूर्ण शक्तींना तीन भागांमध्ये तीन शीर्षलेखांमध्ये सारांशित केले आहे. सर्वप्रथम आहे ... सर्व ऊर्जा म्हणजे विष्णु -शक्ती. सर्व शक्ती, ते भगवान विष्णूच्या विविध क्षमतेचे स्वरूप आहेत. आता, ही ऊर्जा आहे परा , आध्यत्मिक . आणि क्षेत्र ज्ञाख्या तथा परा, आणि जीव, क्षेत्रज्ञ, ते देखील त्या श्रेष्ठ शक्तीच्या गटाशी संलग्न आहेत, जसे भगवद्गीतेमध्येही याची पुष्टी होते. आपण आधीच स्पष्ट केले आहे. आणि इतर ऊर्जा, भौतिक ऊर्जा ही , त्रितीया कर्म संज्ञाया (चै च मध्य ६।१५४) दुसरी ऊर्जा तामसी आहे . म्हणजे भौतिक ऊर्जा , तर भौतिक ऊर्जा देखील भगवद् - (अस्पष्ट) तर म्हणून मृत्यूच्या वेळी, आपण भौतिक ऊर्जेत किंवा भौतिक जगात राहू शकतो , किंवा आपण अध्यात्मिक जगामध्ये स्थानांतरित करू शकतो. तो निकष आहे . तर भगवद् गीता म्हणते ,

यं यं वापि स्मरन भावं
त्यजत्यंते कलेवरम
तं तमेवैति कौन्तेय
सदा तद्भाव भावित: (भ गी ८।६)

आता, जसे आपल्याला विचार करण्याची सवय आहे , या भौतिक उर्जेची किंवा आध्यात्मिक उर्जा पैकी एक आता, आपले विचार कसे बदलावे ? भौतिक उर्जेची विचारशक्ती, अध्यात्मिक ऊर्जेच्या विचारात कशी बदलता येईल? तर आध्यात्मिक उर्जा मध्ये विचार करण्यासाठी तेथे वैदिक साहित्यिक आहेत . से भौतिक ऊर्जेमध्ये विचार करण्यासारख्या अनेक साहित्यिक - वृत्तपत्रे, मासिके, कादंबरी, फिक्शनस् आणि बर्याच गोष्टी आहेत. पूर्ण पाने साहित्याने भरलेले. त्यामुळे आपले विचार या साहित्यात गढून गेले आहेत. त्याचप्रमाणे आपली विचारशक्ती अध्यात्मिक वातावरणात स्थलांतरीत करायची असल्यास , आपल्याला आपली वाचन करण्याची क्षमता वैदिक साहित्यात नेणे आवश्यक आहे. त्यासाठीच विद्वान ऋषींनी इतके वैदिक साहित्यिक बनवले, पुराणे केवळ कथा नाहीत. ते ऐतिहासिक पुरावे आहेत . चैतन्य-चरितअमृत मध्ये खालीलप्रमाणे एक श्लोक आहे

अनादि बहिर्मुख जीव कृष्ण भुलि गेल अतैव कृष्ण वेद पुराण कैला (चै च मध्य २०।११७)

हे विसराळू जीव घटक, बद्ध आत्मा, ते सर्वोच्च पॅरामेश्वरासोबतचे संबंध विसरले आहेत, आणि ते भौतिक कृत्यांच्या विचारांत गुंतलेले आहेत. आणि त्यांची विचारशक्ती अध्यात्मिक क्षमतेमध्ये बदलण्यासाठी, कृष्णद्वैपायन व्यास, त्यांनी अनेक वैदिक साहित्य बनवले आहेत वैदिक साहित्य म्हणजे प्रथम त्यांनी वेदांना चार रूपांत विभागले. मग त्यांनी त्यांना पुराणांद्वारे समजावून सांगितले. मग अल्पज्ञ अशा व्यक्तींसाठी, जसे की, स्त्री , शूद्र , वैश्य, त्यांनी महाभारत निर्माण केले. आणि महाभारता मध्ये त्यांनी भगवद्गीता प्रस्तुत केली . नंतर पुन्हा त्यांनी वेदांत साहित्यात संपूर्ण वैदिक साहित्याचा सारांश दिला. आणि भविष्यातील मार्गदर्शनासाठी वेदांताची सूत्रे त्यांनी स्वतः एक नैसर्गिक टिप्पणी दिली ज्याला श्रीमद-भागवत असे म्हणतात.