MR/Prabhupada 1080 - कृष्ण हा सांप्रदायिक देव नाही . एकच देव आहे - कृष्ण
660219-20 - Lecture BG Introduction - New York
भगवद् गीते मध्ये सारांश सांगितल्याप्रमाणे - एकच देव कृष्ण आहे , कृष्ण हा सांप्रदायिक देव नाही. शेवटच्या भागामध्ये भगवद्गीतेमध्ये भगवंत ठामपणे सांगतात ,
- अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच: (भ गी १८।६६)
भगवंत जबाबदारी घेतात . जो प्रभूला शरण जातो, त्याची तो जबाबदारी घेतो , पापांच्या सर्व प्रतिक्रियांपासून मुक्त करण्याची.
- मल निर्मोचनं पुंसां
- जल स्नानं दिने दिने
- सकृद गीतामृत स्नानम
- संसार मल नाषनम् (गीता महात्मय ३)
दररोज स्वतःला पाण्यामध्ये स्नान करून स्वच्छ करता येते, परंतु जो भगवद गीतेच्या पवित्र गंगे मध्ये मध्ये स्नान करतो , त्याचे गलिच्छ भौतिक जीवन पूर्णपणे नाश होते .
- गीता सुगीता कर्तव्या
- किमन्यै: शास्त्रविस्तरै:
- या स्वयं पद्मनाभस्य
- मुखपद्माद विनि:सृता (गीता महात्मय ४)
कारण भगवद-गीता हि परमेश्वराने स्वतः सांगितली आहे , लोकांनी .. लोकांनी इतर सर्व वैदिक साहित्य वाचण्याची गरज नाही . फक्त जर तो ध्यानपूर्वक आणि नियमितपणे भगवद्गीतावाचतो आणि ऐकतो , गीता सुगीता कर्तव्या ... आणि एखाद्याने हे साधन सर्वप्रकारे अवलंबिले पाहिजे . गीता सुगीता कर्तव्य किमन्यै: शास्त्र-विस्तरै: . कारण वर्तमान काळातील लोक इतर अनेक गोष्टींमध्ये व्यस्त आहेत , सर्व वैदिक साहित्यात लक्ष घालणे त्यांना शक्य नाही. हे एक साहित्य ते पुरेसे आहे कारण हे सर्व वैदिक साहित्याचे सार आहे, आणि विशेषत: सर्व श्रेष्ठ ईश्वराने स्वतः मुखोद्गत केले आहे आहे .
- भारतामृत सर्वस्वं
- विष्णु वक्त्राद्विनि:सृतम्
- गीता-गंगोदकं पीत्वा
- पुनर्जन्म न विद्यते (गीता महात्मय ५)
असे म्हणतात की गंगा नदीचे पाणी जे पितात , ना सुद्धा मोक्ष मिळतो, मग भगवद् गीते विषयी काय बोलावे ? भगवद् गीता संपूर्ण महाभारत मधले अमृत आहे,आणि भगवान विष्णूंद्वारे बोलली गेली आहे. भगवान कृष्ण हे मूळ विष्णू आहेत . विष्णु वकृताद्विनि:सृतम । हे सर्वश्रेष्ठ ईश्वरीय व्यक्तिमत्वाच्या तोंडून निघत आहे . आणि गंगोदकम , असे म्हटले जाते की गंगा प्रभुंच्या कमल चरणातून प्रकट झाली आहे , आणि भगवद्गीता भगवंताच्या मुखातून प्रकट झाली आहे . अर्थात, परमेश्वराच्या मुखामध्ये आणि चरण कमळामध्ये काही फरक नाही. तरीही तटस्थ स्थितीतून आपण भगवद्गीता गंगेच्या पाण्यापेक्षाही अधिक महत्वाचे आहे असे समजून याचा अभ्यास करू शकतो.
- सर्वोपनिषदो गावो
- दोग्धा गोपालनन्दन:
- पार्थो वत्स: सुधीर् भोक्ता
- दुग्धं गीतामृतं महत् (गीता महात्मय ६)
फक्त ... हे गीतोपनिषद हे गायीप्रमाणे आहे, आणि भगवान हे गौ बाळ म्हणून प्रसिद्ध आहेत ,आणि तो या गायीचे दूध काढत असे . सर्वोपनिषदो . आणि हे सर्व उपनिषदांचा सार आहे आणि ज्याला गायीची उपमा दिली आहे. आणि प्रभु प्रवीण गोपालक आहेत ते गायीचे दूध काढत आहेत . आणि पार्थो वत्स .आणि अर्जुन वासराप्रमाणे आहे . आणि सुधीर भोक्ता . आणि विद्वान आणि शुद्ध भक्त हे दूध पिण्यास पात्र आहेत . सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् . अमृत, भगवद्गीतेचे दुध, विद्वान भक्तांसाठी आहे .
- एकं शासत्रं देवकीपुत्रगीतम्
- एको देवो देवकीपुत्र एव
- एको मंत्रस्तस्य नामानि यानि
- कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा (गीता महात्मय ७)
आता जगाने भगवद् गीते कडून ज्ञानाचा धडा शिकला पाहिजे . एकं शास्त्रं देवकीपुत्रगीतम् । एकच शास्त्र आहे, एक सामाईक ग्रंथ संपूर्ण जगासाठी , संपूर्ण जगभरातील लोकांसाठी , आणि ते आहे भगवद्गीता . देवो देवकीपुत्र एव . आणि संपूर्ण जगासाठी एकच ईश्वर आहे, श्रीकृष्ण . आणि एको मन्त्रस्यतस्य नामानि । आणि एक भजन, एक मंत्र, एक स्तोत्र केवळ, एक प्रार्थना , किंवा एक भजन, जे आहे त्याचे नाव जपणे , हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे । एको मंत्रस्तस्य नामानि यानि कर्मापि एकं तस्य देवस्य सेवा । आणि केवळ एक काम आहे, ते म्हणजे सर्वश्रेष्ठ परमेश्वराची सेवा करणे . जर भगवद्गीतेकडून शिकले तर मग लोक इच्छुक आहेत , एक धर्म, एक देव, एक शास्त्र, एक व्यवसाय किंवा जीवनाचे एक कार्य असण्यात इच्छुक आहेत . याचा सारांश भगवद्गीतेमध्ये आहे. कि एक ,एक देव , कृष्ण . कृष्ण हा सांप्रदायिक देव नाही . कृष्ण नावापासून ... कृष्ण म्हणजे, आपण वर सांगितल्याप्रमाणे, कृष्णाचा अर्थ आहे परम आनंद .