MR/Prabhupada 1058 - भगवद्गीतेचे प्रवक्ता श्रीकृष्ण आहेत

Revision as of 14:51, 21 October 2018 by Vanibot (talk | contribs) (Vanibot #0023: VideoLocalizer - changed YouTube player to show hard-coded subtitles version)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


660219-20 - Lecture BG Introduction - New York


भगवद्गीतेचे प्रवक्ता श्रीकृष्ण आहेत. भगवद्गीतेचे प्रवक्ता श्रीकृष्ण आहेत. भगवद्गीतेच्या प्रत्येक पानावर त्यांचा उल्लेख आहे, परमेश्वर अथवा भगवान म्हणून. शक्तिमान महापुरुष अथवा कोणत्याही शक्तिमान देवतेलासुद्धा काही वेळा भगवान म्हणून संबोधण्यात येते. पण या ठिकाणी श्रीकृष्ण हे निश्‍चितचश्रेष्ठ महापुरुष आहेत असे सुचविण्यात आले आहे. पण भगवान श्रीकृष्ण, सर्व महान आचार्यांनी, उदा. शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्क, श्री चैतन्य महप्रभू आणि अशाच अनेक भारतातील अनेक अधिकृत विद्वान्नानि व आचार्यांनी अर्थात, वैदिक ज्ञानाच्या आचार्यांनी, या सह शंकराचार्यांनी सुद्धा, श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम आहेत अशी मान्यता दिली आहे. भगवंतांनी स्वतःला भगवद्गीते मध्ये 'पुरुषोत्तम भगवान' म्हणून घोषित केले आहे. ब्रह्म संहिता आणि इतर सर्व पुराणांनी, विशेषकरून श्रीमद् भगवत पुराणानी, त्यांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला आहे. कृष्णस्तु भगवान स्वयं (श्री भ १।३।२८) म्हणून आपण भगवद्गीतेला भगवंतांनी ज्या स्वरुपात, जशी सांगितली आहे त्या स्वरुपातच स्वीकारली पाहिजे.

तर भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात भगवंत सांगतात की:

इमं विवस्वते योगं
प्रोक्तवान अहम अव्ययम
विवस्वान मनवे प्राह
मनुर इक्ष्वाकवे अब्रवीत्
(भ गी ४।१)
एवं परम्परा प्राप्तम
इमं राजर्षयो विदु:
स कालेनेह महता
योगो नष्ट: परन्तप
(भ गी ४।२)
स एवायं मया ते अद्य
योग: प्रोक्त: पुरातन:
भक्तो असि मे सखा चेति
रहस्यं हि एतद् उत्तमम्
(भ गी ४।३)


या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात की, "ही योगपद्धती म्हणजेच भगवद्गीता, सर्वात आधी मी सूर्यदेवाला सांगितली आणि सूर्यदेवाने मनूला स्पष्टपणे सांगितली मानूने ईक्ष्वाकूला, आणि या प्रमाणे शिष्य परंपरेनुसार, एक प्रवक्त्यानंतर दुसर्‍या प्रवक्त्याने, याप्रमाणे, ही योग पद्धती चालत आली. परंतु कालांतराने ती लुप्त झाली आहे. तश्यामुळे, मला तीच योगपद्धती तुला पुन्हा सांगत आहे. तीच जुनी भगवद्गीतेचि योग पद्धती किंवा गीतोपनिषद्. कारण तू माझा भक्त आणि मित्र आहेस. त्यामुळे तुलाच ही समझण्याची क्षमता आहे."

याचे तत्पर्य असे आहे की, भगवद्गीता हा ग्रंथ विशेषकरुन भागवद भक्तांसाठीच आहे. अध्यत्मवादी संघाचे तीन प्रकार असतात - ज्ञानी, योगी आणि भक्त. किंवा निर्वीशेषवादी, ध्यानयोगी आणि भक्त. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात की, "मी सांगत आहे किंवा मी तुला नवीन गुरूशिष्य परंपरेतील सर्व प्रथम श्रोता बनवीत आहे. कारण जुनी परंपरा खंडित झाली आहे, म्हणून माझी इच्छा आहे की पुन्हा एक परंपरा स्थापित करावी, त्याच परंपरेमध्ये जी सूर्यदेवपासून इतारांकडे चालत आली आहे. तर तू, तू याचा स्वीकार कर आणि याचे वितरण कर. किंवा ही पद्धती, भगवद्गीतेचि योगपद्धती आता तुझ्या माध्यमातून वितरीत होऊ दे. तू भगवद्गीता .जाणण्या मध्ये अधिकारी बन." आता इथे एक निर्देश आहे की भगवद्गीतेचा उपदेश खासकरून अर्जुनलाच सांगण्यात आला, भगवंताचा भक्त, श्रीकृष्णाचा साक्षात शिष्य. आणि इत्कच नव्हे तर तो श्री कृष्णाचा जिवलग सखा असून, सलगीने संपर्कात आहे. म्हणून ज्या व्यक्तीकडे अर्जुनासर्खे गुण आहेत ती व्यक्तीच भगवद्गीता उत्तम प्रकारे जणू शकते. म्हणजेच त्याने भक्त असले पाहिजे, त्याने भगवंताशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित केले पाहिजे.